मेढा ग्रामपंचायतीचा उपक्रम
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
जगावर उदभवलेल्या कोरोना महामारीचा सामना संपूर्ण जग करत आहे. बहुतांश राष्ट्रांनी या महामारीला आटोक्यात आणले आहे.लसीकरणाला जरी सुरुवात झाली असली तरी हा महामारीचा लढा सुरूच आहे. याच कोरोनाकाळात अनेक शासकीय कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले प्राण संकटात टाकून जगातील सर्वात मोठे सामाजिक कार्य केले आहे.अशा प्रकारे कार्य करणाऱ्या शासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध मान्यवरांचा मेढा ग्रामपंचायततर्फे प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायतीला सुरक्षतेची साधने उपलब्ध करून देणारे कंपनीचे अधिकारी हेमंत मोहिते, कोरस इंडिया कंपनीचे अधिकारी नंदकिशोर दाईटकर तसेच विविध क्षेत्रातील कर्मचारी ग्रामसवेक अमोल तांबडे, लोकशाहीर पुरस्कार प्राप्त झाला म्हणून कवीगायक सुरेंद्र जाधव यांचा तर मेढा प्रा.शा.मुख्याध्यापिका आशा कनोजे, रेवोली प्रा.शा.मुख्याध्यापिका मनिषा मोरे, शिक्षक प्रसाद पतंगे, शिक्षिका शिल्पा दुधबर्वे, शिक्षिका अनुजा कोकडवार,फणसवाडी शा. मुख्याध्यापक सुदाम लोंडे, मुख्याध्यापक आदिवासी वाडी रेवोली शिक्षक वेटकोळी, अंगणवाडीसेविका सुनिता पोळेकर, जगिता गोवर्धने, संगिता खैरे, वैदेही खांडेकर, उज्वला महाले, कोतवाल राजेश काशिद, ग्रा.पं. कर्मचारी छगन लाड, रागिणी गोवर्धने, आरोग्यसेविका श्रेजल उंबरे, दिक्षा घरट या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमातील सर्व मान्यवरांचा सत्कार माजी सभापती लक्ष्मण महाले, युवा नेते महेंद्र खैरे, सरपंच स्नेहा खैरे, उपसरपंच नम्रता सुतार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी तंटामुक्त अध्यक्ष विलास खांडेकर, माजी सरपंच विलास उंबरे, चेअरमन भगवान गोवर्धने, विजय मोरे, ग्रा.पं. सदस्य उदय मोरे, रविंद्र जाधव, श्रेजल उंबरे, नम्रता महाले, ज्ञानेश्वरी गोवर्धने, समिधा जवके, शेवंती शिद, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच खैरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व आभार ग्रामसेवक तांबडे यांनी मानले.








Be First to Comment