सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग ।
“अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया” यांच्या तर्फे शिवरामपल्ली, हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या “ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२१” या राष्ट्रीय पुरस्काराने, महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील उभरते व्यक्तिमत्त्व श्री. धनंजय प्रभाकर म्हात्रे, अलिबाग – कुरुळ रायगड यांचा सन्मान करण्यात आला.
त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या विविध स्तरावरील सामाजिक क्षेत्रातील कामगिरी व अँटी करप्शन फाउंडेशन आॅफ इंडिया च्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी अँटी करप्शन फौंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नरेंद्र अरोराजी – दिल्ली, सुप्रसिद्ध सिने अभिनेता श्री. रझा मुरादजी आणि पत्रकार श्री. अभिषेक बच्चनजी तसेच तेलंगणा राज्यातील विविध उद्योजक, व संपूर्ण भारतातून आलेले विविध मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment