मुख्य लोकांचा रहदारीचा असलेल्या रस्त्यावर तळ्याचे स्वरूप !
सिटी बेल लाइव्ह । याकूब सय्यद । नागोठणे ।
नागोठणे येथील श्री.प्रदीप दुर्वे यांच्या बिल्डिंग शेजारी असलेली बिल्डिंगचा सांडपाणी व शृंगारतळातील पाणी नागोठणेकर यांच्या घरासमोरील लोकांचा मुख्य रहदारीचा असलेला रस्त्यावर साचून तळ्याचा स्वरूप बनला आहे.
तो सांडपाणी ग्रामपंचायतीच्या गटारातून निचरा न होता तो लोकांच्या रहदारीचा मुख्य रस्त्यावर साचलेल्या असल्याने
त्या दुर्गंधीत सांडपाण्यातून पादचारी यांना तसेच मोटरसायकल स्वार यांना बऱ्याच दिवसापासून त्या रस्त्यावरून रहदारी करिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागोठणे ग्रामपंचायत तसेच त्या वार्डातील लोकप्रतिनिधी यांना या परिस्थितीची माहिती असून देखील माहिती नसल्याचा सोंग करून याप्रकरणी कानाडोळा का करत आहेत याचा आश्चर्य लोकांत व्यक्त होत आहे.
नागोठणे ग्रामपंचायत या परिस्थितीत कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची जनतेत चर्चा आहे.
बिल्डिंगचा सांडपाणी रस्त्यावर साचून तळ्याचा स्वरूप बनलेल्या गंभीर परिस्थितीकडे यापुढे नागोठणे ग्रामपंचायतीने त्या वार्डातील सांडपाणी गटार बांधून सांडपाणी मुख्य लोकांच्या रहदारी रस्त्यावर येऊन साचला आहे.
तो सांडपाणी निचरा होण्याकरिता नागोठणे ग्रामपंचायतीने सांडपाणीचा गटार बांधून दुर्गंधीत पाणी निचाराची व्यवस्था करावी.
अशी मुख्य मांगणी दररोज रस्त्यावरून रहदारी व प्रवास करणाऱ्या पदचारी व मोटरसायकल स्वरांना कडून होत आहे








Be First to Comment