Press "Enter" to skip to content

पनवेल परिसरात चार वेगवेगळ्या अपघात 2 ठार ; 3 जखमी

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

पनवेल परिसरात गेल्या 24 तासात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातात 2 ठार तर 3 जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पनवेल जवळील खांदा गाव स्मशानभूमी समोरील कळंबोली ते जेएनपीटी रस्त्यावरुन स्कुटीवरुन सेल्वेडोर कारडोस (54 रा.पळस्पे) व त्यांचा मुलगा शालोम कारडोस (17) हे घरी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या गाडीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात सेल्वेडोर कारडोस हे जखमी झाले आहेत. तर त्यांचा मुलगा शालोम हा गंभीररित्या जखमी होवून मयत पावला आहे. या अपघाताची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

तर दुसर्‍या घटनेत पळस्पे फाट्याच्या पुढे जेडब्ल्यूसी कंपनीसमोर मोटार सायकलवरुन चाललेले प्रवीण ढगे (24) व त्यांच्या सहकारी जात असताना अज्ञात गाडीची धडक त्यांच्या मोटार सायकलीस बसल्याने झालेल्या अपघातात ते दोघे जखमी झाले आहेत.

तिसर्‍या घटनेत कुंडेवहाळ येथे जगदीश करावकर यांच्या ताब्यातील इनोव्हा गाडीची धडक प्रिंन्सी पाटील (दिड वर्षीय) हिला बसल्याने त्यात ती गंभीररित्या जखमी होवून त्यात तीचा मृत्यू झाला आहे. तर चौथ्या घटनेत पाडेघर समोरील सर्व्हीस रोडवर एका भरधाव ट्रेलरने बहुरुपी करून भिक्षूखी मागणारे अरुण सोळंके (29) या धडक दिल्याने त्यात ते जखमी झाले आहेत. या तिन्ही अपघातांची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.