Press "Enter" to skip to content

मोहोपाडा येथे जैन धर्मीय आचार्य महाराजांचे आगमन

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

रसायनी पाताळगंगा परिसरात मोहोपाडा येथे जैन धर्मीय समाजबांधवांचे श्री जैन श्वेतांबर मंदिर आहे.या मंदीरात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडतात.जैन समाजबांधवांचे विविध व्रत, उपासना,गुरु महाराजांचा पुजा अर्चा आदी कार्यक्रम याच मंदिरात संपन्न होतात.

जैन धर्मांचे शंभर वर्षीय वर्तंमान गच्छाधिपती आचार्य देवेश श्री दौलतसागर सुरीखरजी महाराज, श्री नंदिवर्धंन सागर सुरीजी महाराज, आचार्य श्री हर्षंसागर सुरीखरजी महाराज व मूनीमंडल यांचे मोहोपाडा येथे आगमन होताच नविन पोसरी प्रवेशद्वारापासून बॅन्डच्या तालावर आचार्य महाराजांना बसण्याची व्यवस्था करुन नविन पोसरी-मोहोपाडा ते श्री जैन श्वेतांबर मंदिर अशी मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणूकीत जैन महिलांनी मरुन लाल रंगाचा वेष परिधान केला होता.यावेली तरुणांनी बॅन्डच्या तालावर नाचत आचार्य महाराजांचे स्वागत केले तर महिलांनी ओवाळणी करून दर्शंन घेतले.हि मिरवणूक मोहोपाडा बाजारपेठेतील शिवाजी चौकात आल्यानंतर महिलांनी नृत्य करुन स्वागत केले.

जैन धर्मांचे शंभर वर्षीय वर्तंमान असणा-या आचार्य महाराजांचे मोहोपाडा येथे आगमन झाल्याने मोहोपाडा जैन श्वेतांबर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गुरु महाराज दोन दिवस मोहोपाडा येथे राहुन दिक्षा समारोहासाठी कर्जंत येथे जाणार असल्याचे व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद जैन यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.