Press "Enter" to skip to content

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी घेतली पालकमंत्री आदिती तटकरेंची भेट

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या प्रयत्नातून माथेरानच्या दलित वस्तीला येणार सुगीचे दिवस

सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

अनेक वर्षांपासून माथेरान मधील दलित वस्तीकडे आणि तेथील पायाभूत सुविधांची वानवा प्रकर्षाने जाणवत होती.दरवेळी इथल्या सर्वसामान्य लोकांना केवळ आश्वासने दिली जात होती. परंतु प्रत्यक्षात मात्र निवडणुका झाल्या की ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे इथल्या नागरिकांची एकप्रकारे हेळसांड होत गेली आणि या भागाचा विकास खुंटला गेला होता अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत होता. स्वच्छता बाबतीत सुध्दा इकडे आजवर कानाडोळा केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची दि.२ रोजी त्यांच्या दालनात भेट घेऊन दलित वस्तीचा सुधारित पद्धतीने कायापालट करण्याबाबत सहकार्य करावे असे विनंती पूर्वक निवेदन दिले आहे.

यावेळी नक्कीच आमच्या परीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन आदिती तटकरे यांनी दिले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष अजय सावंत आणि विवेक चौधरी उपस्थित होते.

माथेरानच्या दलित वस्तीचा इथल्या विकास कामात नेहमीच सहभाग राहिला आहे. परंतु या वस्तीच्या सुधारणे साठी आलेला निधी वापराविना माघारी गेला होता. जवळपास पन्नास लाख रुपयांचा हा भरीव निधी पुन्हा नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात यावा जेणेकरून या निधीच्या माध्यमातून बहुतांश कामे मार्गी लागू शकतात. सुनियोजित पद्धतीने गटारांची व्यवस्था त्याचप्रमाणे काही भागात अपूर्ण असणारी रस्त्याची कामे तसेच अन्य पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी या निधीची नितांत आवश्यकता आहे त्यामुळे लवकरच हा निधी नगरपरिषदेकडे वर्ग करावा असे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितले आहे त्यामुळे लवकरच हा निधी प्राप्त केला जाईल असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

त्यामुळे या दलित वस्तीचा नक्कीच कायापालट होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे तूर्तास तरी दलित वस्तीतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.