सह्याद्री विद्यार्थी अकादमी व सेवा सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी कर्जत विभाग आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारणे आणि गौरकामत येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सह्याद्री विद्यार्थी अकादमी महाराष्ट्र राज्य प्रमुख अतुल पडवळ, सेवा सहयोग फाउंडेशनचे नंदकुमार मनेर,नारायण मिसाळ, सह्याद्री प्रतिष्ठान व सह्याद्री विद्यार्थी अकादमी कर्जत विभागाच्या मार्गदर्शिका शिशु मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा गोरे, श्री स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय जांभिवलीचे मुख्याध्यापक प्रमोद किरंगे तसेच शाळेचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे विद्यार्थी सेवक निलेश गुरव, वैभव कांबळे, चेतन वाघमारे, सचिन शेडगे, कौस्तुभ पेठे, प्रणव जंगम, हेमलता कांबळे, मयूर मोरे , विशाल देशमुख, स्वप्नाली पाटील आदी उपस्थित होते.








Be First to Comment