Press "Enter" to skip to content

नेरळ येथील बीआरएसपी कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत तालुक्यातील नेरळ येथील बीआरएसपी कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांचे नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर प्रभावित होवुन वंचित बहुजन आघाडी कर्जत संपर्क कार्यालयात नेरळ येथील बीआरएसपी चे पदाधिकारी व कार्यकर्ते अध्यक्ष मोहाची वाडी संदेश तुळशीराम ठाकरे, नेरळ शहर उपाध्यक्ष मुकेश सुखदेव गायकवाड, संजय भिवा मोरे, कर्जत तालुका संघटक प्रमोद धोंडु बार्हे, दिनेश जमदाडे यांनी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांचे नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी हरिश्चंद्र यादव, अनिल गवळे, सुनिल गायकवाड, प्रदिप ढोले, राजु ढोले, अशोक कदम,शहर पदाधिकारी लोकेश यादव उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.