Press "Enter" to skip to content

अकरा पोलीस ठाण्याला हवे असलेले आरोपी खोपोली पोलीसांच्या जाळ्यात

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

राञीच्या वेळेस दुकानाचे शटर उचकटून चोरी करणारी दुकलीला खोपोली पोलीसानी सापळा रचत अटक केली असून तब्बल अकरा पोलीस ठाण्याचे पोलीस या दोघांच्या मागावर होते. 

विकास दिलीप कांबळे वय-27 आणि गणेश सचिन जमदाडे (वय-19 वर्षे, रा.बौध्द नगर, एम.आय.डी.सी पाण्याचे टाकीजवळ पिंपरी जि.पुणे) अशी अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. 

   खोपोली शहरात रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर उचकटून चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक  अशोक दुधे, अपर पोलीस अधिक्षक म सचिन गुंजाळ यांनी गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस निरिक्षक धनाजी क्षीरसागर याना सुचना दिल्या होत्या.त्यानुसार पोलीस निरिक्षक क्षीरसागर यांनी पोलीस उप निरीक्षक अमोल वळसंग व गुन्हे प्रकटिकरण पथकास सक्त रात्रीगस्त वाढवून   चोरटयांचा शोध सुरू केला. 

    दिनांक 27जानेवारीला पोलीस पथक गस्तीवर असताना पहाटे पाचच्या दरम्यान  शिळफाटा येथे अजय वाईन्स या शॉपचे शटर उचकटुन चोरी करण्याच्या प्रयत्न करीत असताना सचिन जमदाडे रंगेहाथ सापडला होता.तर त्याचा साथीदार विकास कांबळे फरार झाला होता.फरार आरोपी विकास दिलीप कांबळे याचा शोध घेवुन खोपोली पोलीसानी  त्यास अटक केली आहे.

दोघानी खोपोली भागात चोरीची कबुली आहे.या दुकलीकडे चिचंवड येथून चोरलेल्या दोन दुचाकि सापडल्या आहेत. आरोपी विकास दिलीप कांबळे हा पुणे, पिंपरी चिचंवड पोलीस आयुक्तालयात 11 पोलीस स्टेशनला विविध गुन्हयात पोलीसांच्या रेकाॅर्डवर होता.  त्यांचेवर या पुर्वी पुणे, पिंपरी चिचंवड पोलीस आयुक्तालयात चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरीचे 37 गुन्हे दाखल असल्याचे उघडकिस आले आहे.  सराईत चोरट्याना अटक करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर  संजय शुक्ला व वरिष्ठ पोलीस निरीक्षक  धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल वळसंग, सहा.पोलीस उप निरीक्षक  श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार राजेंद्र पाटील,  दिनेश गायकवाड, पोलीस अंमलदार प्रविण भालेराव,  प्रदिप खरात, सतिश बांगर,  कादर तांबोळी तसेच सायबर सेलचे  अक्षय पाटील व तुषार घरत यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली  आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.