Press "Enter" to skip to content

शिवसेना नवीन शेवा शाखेचा ३३ वा वर्धापन दिन साजरा

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

नवीन शेवा शाखेचा ३३ वा वर्धापनदिन सोहळा रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलाआघाडी तर्फे हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर हेे होतेे.

त्यांनी शिवसेना नवीन शेवा शाखेचा ३३ वर्षाच्या घौडदौडीचा आढावा घेताना. २५ वर्षे ग्रामपंचायवर शिवसेनेची सत्ता, दोन वेळा पंचायत समिती सदस्य, तीन वेळा जिल्हापरिषद सदस्य व एक वेळा या शाखेचा सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राच्या विधानसभेत लक्षवेधिकार आमदार म्हणून गाजवला असल्याचे सांगितले. माझ्या पाच वर्षाच्या आमदारकीचा पगार मतदारसंघातील ९०० अपंग बांधावामध्ये मदत म्हणून वाटप केला. माझ्या पाच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये पुनर्वसानाचे प्रश्न, बंधारे, सेफ्टी झोन, होल्डिंग पॉइंट, मच्छिमार बंदरे, एअरपोर्ट असे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. कोरोना काळावधीमध्ये २३,००० गरजू व गरीब नागरिकांना अन्नधान्य,

जीवनावश्यक वस्तू, भाज्या, सॅनिटायझर, मास्क चे वाटप करण्यात आले, तसेच ११ वेळा रक्तदान शिबिर भरवून ७०० रक्त बाटल्या रक्तपेढ्यांना कोरोना रूग्णांसाठी सुपूर्द केल्या. ०७ लक्ष ५५ हजार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केली, तसेच सिडकोकडून ५० ऑक्सिजन बेडचे रुग्णालय मिळवून जनतेच्या सेवेसाठी सुपूर्द केले. लवकरच १०० बेडचे रुग्णालय उरणकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देईन आणि म्हणूनच आता झालेल्या १७ पैकी १४ ग्रामपंचाय निवडणुकीमध्ये विजय संपादन करून उरणकर जनतेने आमचावर विश्वास दाखविलेला आहे, यामुळे उरण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना नंबर एकचा पक्ष केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख, विश्वस्त जे एन.पी.टी, दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुखक नरेश रहाळकर तालुकाप्रमुख संतोष ठाकूर , उ.न.प.गटनेते गणेश शिंद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमामध्ये नुकत्याच उरण तालुक्यामध्ये पार पडलेल्या ग्रामपंचाय निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी मालती मनोहर भोईर, जे. पी म्हात्रे, ममता पाटील, श्री. गणेश म्हात्रे, श्री. विजय भोईर, श्री. हिराजी घरत, सौ.प्रणिता म्हात्रे, दिपक ठाकूर, रमेश म्हात्रे, हितेंद्र म्हात्रे, विनोद म्हात्रे, नरेश मोकाशी, कमलाकर पाटील, जयवंत पाटील, श्रीमती वंदना पवार, कौशिक ठाकूर, प्रदिप ठाकूर, विना तलरेजा, अमित भगत, के. एम.घरत, महादेव घरत, मेघा मेस्त्री, एस. के. पुरो, विश्वास तांडेल, भूषण ठाकूर, रोहिदास पाटील, अतुल ठाकूर, निशांत घरत, वर्षा पाठारे, दिलिप रहाळकर तसेच उरण तालुक्यातील शिवसेनेच्या अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी, युवसेना,महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.