Press "Enter" to skip to content

खांब येथे भीषण अपघात : अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वाचा मृत्यू !

वाहन चालक फरार

सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार ।
       

मुंबई – गोवा महामार्गावर
खांब हद्दीत धनवी यांच्या टपरी जवळ सोमवार दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून अपघात झाला, या अपघातात दुचाकीस्वार रा.बारापाडा पनवेल यांचा दुर्देवी मुत्यु झाल्याची घटना घडली असून या अपघातानंतर धडक देणारा अज्ञात वाहन चालक फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार सोमवार दि.१/२/२०२१ रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास दुचाकी चालक अकबरअली महमद कुमार वय ( ५५) रा.बारा पाडा पनवेल हे आपल्या ताब्यातील ऍक्टिव्हा वाहन क्र (एम्.एच.४६.ए.के.४२५२) ही मुंबई गोवा महामार्गावरून कोलाड बाजू कडून मुंबई असे घेऊन जात असतांना हे वाहन मौजे खांब हद्दीत धनवी यांच्या टपरी जवळ पोट कालवा मोरी लगत आले असता
कोणत्या तरी अज्ञात वाहन चालकाने कुमार यांना ठोकर मारून अपघात झाला.

या अपघातात दुचाकीस्वार अकबरअली महमद कुमार यांचा डोक्यास व हातास गंभीर दुखापत होऊन त्यांचा दुर्देवी मुत्यु झाला असून हा अपघात झाल्यावर धडक देणारा अज्ञात वाहन चालक खबर न देताच फरार झाला आहे.

            कोलाड पोलिसात या अपघाताची नोंद०००६/२०२१भा.द.वि कलम ३०४ A,२७९,३३८,मोटार वाहन अधिनियम १९८८,१८४,१३४,प्रमाणे करण्यात आली असून या पुढील तपास कोलाड सपोनि सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एस आर माने करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.