सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
तालुक्यातील भेंडखळ गावचे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी बाळकृष्ण पाटील यांचा नातू व प्रवीण (बाळा) पाटील यांचा सुपुत्र राजस पाटील याने सीए (सनदी लेखापाल) ही पदवी संपादन केली आहे. राजस च्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजस हा पहिल्या पासूनच अभ्यासात हुशार होता. दहावीत ९४ तर बारावीत ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता. दहावी नंतरच राजसने सीए पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली होती. त्यामध्ये कोणताही खंड न पडू देता यशस्वीपणे सीए पदवीचा अभ्यासक्रम पुरा करून वयाच्या २२ व्या वर्षी सीए(सदनी लेखापाल) पदवी संपादन केली.
विशेष म्हणजे कोरोनाच्या महामारीत सर्व ठप्प असतानाही राजसने आपल्या अभ्यासात कोणताही खंड न पडू देता यशस्वीपणे पूर्ण केला.
राजस ला याकामी वाशी येथील ई. ए. पाटील अँड असोसिएशट व एकनाथ पाटील सर आणि सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशामध्ये आई वडील, सेंटमेरी शाळेचे शिक्षक वर्ग व इतर हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच मी सीए ही पदवी संपादन केली असून या पदवी उपयोग मी येथील जनतेच्या सेवेसाठी लवकरच कार्यालय सुरू करणार असल्याचे राजस पाटील यांनी सांगितले.
राजस पाटील याने पहिल्याच प्रयत्नात सीए(सदनी लेखापाल) ही पदवी संपादन केल्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment