सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
जगावर कोरोनाची दहशत असल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. ही भीती दूर करण्यासाठी कोरोनावर लस निर्माण करण्यात आली आहे. ही लस घेतलीतर कोरोना हद्दपार होईल. या हेतूने व जनतेच्या मनातील भीती दूर करण्यासाठी ८० डॉक्टरांनी कोविडची लस टोचून घेतली आहे.
उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी कोविड लस घेतली. सरकारच्या या उपक्रमात जवळपास ८० डॉक्टरांना कोविडची लस देण्यात आली आहे.
या कोविड लस संदर्भात जनतेत भीतीचे वातावरण आहे. ही भीती दूर करण्यासाठीच डॉक्टरांनी प्रथम लस टोचून घेतली आहे. त्यामुळे ही लस घेतल्याने कोणताच धोका नसून उलट आपला कोरोनापासून बचाव होणार आहे. त्यामुळे देशाबरोबर समाजाला या आजारापासून मुक्त करण्यासाठी आम जनतेने कोविडची लस घ्यावी असे आवाहन उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनच्या टीमने केले आहे.
लसीकरणाची मोहीम मेडिकल इंदिरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी पार पाडली. यावेळी असोशीएशनचे पेटरान डॉ. सुरेश पाटील, डॉ. मंगेश डाके, अध्यक्ष डॉ. विकास मोरे, सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे, डाॅ. घनःश्याम पाटील, डॉ. संजीव म्हात्रे आणि सर्व सभासद उपस्थित होते.








Be First to Comment