शिक्षक आमदार बाळाराम पाटील आणि ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
सिटी बेल लाइव्ह । ठाणे ।
कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत पुरोगामी शिक्षक संघटनेची शिक्षक शिक्षकेत्तराच्या प्रलंबित प्रकरणे सोडविण्यासाठी सहविचार सभा जिल्हा परिषद ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
या सहविचार सभेत अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका तातडीने होणेबाबत, मुख्याध्यापक उपमख्या. पर्यवेक्षक मान्यता, वैद्यकीय बिले, फरक बिले, dcps पावत्या, pf पावत्या, वरिष्ठ, निवडश्रेणी ची यादी लवकर प्रसिद्ध करणे,, वैयक्तिक मान्यता प्रकरण, पेन्शन प्रकरणे, वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण आयोजन, शिष्यवृत्ती प्रकरणे, सातवा वेतन आयोग थकबाकी पहिला हप्ता मिळणेबाबत, पीएफ लोन प्रकरणे, निवृत्त शिक्षकांना सातवा वेतन आयोग थकबाकी पहिला हप्ता रोखीने मिळणेबाबत, सेवा सातत्य प्रकरण, शाळेच्या इंडेक्स नंबर प्रकरणांबाबत, प्रलंबित वैद्यकीय बिले प्रस्तावास मंजुरी, एनपीएस निवृत्ती योजनेबाबत परिपूर्ण माहिती देणारे प्रशिक्षण आयोजित करणेबाबत मागणी मांडण्यात आल्या.जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक श्री. बडे सर यांनी सर्व मागण्या सविस्तर ऐकून लवकरच या मागण्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सभेत उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक समस्या मांडल्या. त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण मा ना श्री बाळाराम पाटील सर आणि उपस्थित शिक्षण निरिक्षक कार्यालय अधिकाऱ्यांनी केले.
या सभेला जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री. बडे साहेब, अधीक्षक श्रीम. भारमल मॅडम प्राथमिकचे अधीक्षक श्री. गोमासे साहेब वेतन निश्चिती अधीक्षक श्रीम. बाविस्कर मॅडम तसेच पे युनिट चे कर्मचारी पुरोगामी शिक्षक संघटनेचे संघटनेचे पदाधिकारी श्री भानुदास तुरुकमाने सर,उमाकांत राऊत सर श्री. कोळपे सर, खांबाळकर, महाजन, चेमटे, धनगर मदने, उगलमोगले, शर्मा, भोसले,व पालघर व ठाणे जिल्ह्यातील शिक्षक या सभेला उपस्थित होते.








Be First to Comment