सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
सहयोग अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीने कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे खा.सुनील तटकरे यांना आपल्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील अपंग व्यक्तींच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी सहयोग अपंग कल्याणकारी संस्थेची स्थापना करण्यात आली असून या संस्थेतर्फे आतापर्यंत ब-याच अपंगांच्या समस्या सोडवित चांगले यश आले आहे. त्याच अनुषंगाने काम करीत असताना ब-याच बाबतीत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे संस्थेचे सदस्य मारूती तुपकर यांनी माहिती देताना सांगितले आहे. तर काही समस्यांच्या बाबतीत न्याय मिळावा या उद्देशाने कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे खा.सुनील तटकरे यांना अपंगाचे यु.टी.आय.डी.कार्ड मिळावे,संस्थेच्या कार्यालयीन कामकाजासाठी रोहे शहरात खोली मिळावी तसेच अपंगाच्या विविध मागण्यासाठी सदरचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश कांबळे,उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता,सचिव प्रदीप खराडे,सहसचिव रमेश खराडे, खजिनदार संजय गौ.टीटी, सहखजिनदार निव्रुत्ती सुर्वे, सदस्य दिलिप खामकर, जयश्री पुजारी,मयुरी तुपकर, मारूती तुपकर,गणेश जंगम आदींसह मोठ्या संख्येने अन्य सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment