खालापूरात एएमपी कंपनी विरोधात फसवणुकिचा गुन्हा : पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
जास्त व्याजाचे आमिष दाखवून 3लाख 66हजार,732 रूपये हडप केल्याप्रकरणी एएमपी डिरेक्ट कंपनीचे मंगेश पाटील,रेश्मा हाडप,प्रतिभा पाटील,चिञा हाडप आणि संदिप हाडप विरोधात गुन्हा दाखल झाल्याने खालापूरात खळबळ उडाली असून मंगेश पाटील याला पोलीसानी अटक केली असून चार जण फरारी आहेत.
एएमपी नावाने मंगेश पाटील यानी गुंतवणूक कंपनी सुरू केली होती. एएमपी डीरेक्ट या नावाने शिळफाटा सेलिब्रेशन हॉटेलच्या वरती कार्यालय देखील उघडण्यात आले होते.
कंपनीत एकदाच 1 लाख रूपये भरा व पुढील 20 महीने प्रमाणे प्रत्येक महीन्यात 9 टक्के प्रमाणे बॅकेत व्याज जमा होईल असे आमिष गुंतवणूकदाराना दाखविण्यात आले होते.कल्याणी पिंगळे यानी जून 2019 मध्ये 4लाख 50हजार रुपये गुंतवणूक एएमपी कंपनीत केली. मुदत संपल्यावर त्यातले केवळ83हजार 268 रूपये परत देण्यात आले. उरलेले 3लाख 66हजार 732 रूपये कल्याणी यानी मागितले असता ते देण्यास टाळाटाळ करण्यात आली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कल्याणी पिंगळे यानी पोलीस ठाणे गाठत एएमपी कंपनी विरोधात तक्रार दिली.पोलीसानी महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा,1999 चे कलम 406,420,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सूञधार मंगेश पाटील याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि सतीश आस्वर हे करीत आहेत.
खालापूरसह रायगडच्या बाहेर एएमपी गुंतवणूक कंपनीने हातपाय पसरले होते.तालुक्यातच कोट्यावधीची गुंतवणूक असून शेकडो जणानी पैसे गुंतविले होते.मंगेश पाटीलवर गुन्हा दाखल होवून अटक झाल्याने अनेकांची पायाखालची जमीन सरकली आहे.अजून मोठ्या प्रमाणात तक्रारदार पुढे येणार आहेत.








Be First to Comment