Press "Enter" to skip to content

पुई येथे चारशेहून अधिक रुग्णाची नेत्र तपासणी 28 रुग्णांवर शस्त्रक्रिया

शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री क्षेत्रपाल मित्र मंडळाचा उपक्रम !

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील पुई येथे श्री क्षेत्रपाल मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ पुई यांच्यावतीने व निलिकाँन फुड डाईज अँड केमीकल, लायन्स क्लब रोहा, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग, संस्कार सेवा संस्था मुंबई व समता फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विशेष कोकण विधान परिषदेचे आ अनिकेत तटकरे यांच्या सहयोगाने संपन्न झालेल्या मोफत नेत्रचिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबिरास श्री क्षेत्रपाल मित्र मंडळाच्या उपक्रमास नेत्ररूग्णांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.

रोहा तालुक्यातील राजिप प्राथमिक शाळा पुई या ठिकाणी संपन्न झालेल्या शिबिरात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांवर मांस वाढणे,अथवा वेळ येणे, अश्रूग्रंथी, तिरळेपणा आशा नेत्र विकारांची तपासणी व उपचार त्याच बरोबर आयोजित शिबिरात चारशेहुन अधिक नेत्ररुग्णांची तपासणी तसेच दोनशेहून अधिक गरजवंताना मोफत चष्मे वाटप करत जवळपास दृष्टीदोष आढळणाऱ्या अठ्ठावीस रुग्णांवर मोफत अलिबाग येथे शस्त्रक्रिया उपचार करून सुखरूप पुन्हा रुग्णांना त्यांच्या निवासस्थानी सोडण्यात आले तसेच दोन जेष्ठ बधिर नागरिकांना कानातील मशीन ऐकू येण्यासाठी सदरच्या मंडळाच्या वतीने मोफत वाटप करण्यात आल्या .

कोलाड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरिक्षक भूषण जाधव यांच्या शुभहस्ते या शिबिराचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी रोहा तहसिलदार श्रीमती कविता जाधव, आय सेंटरचे चेअरमन रविंद्र घरत, लायन्स क्लब सेक्रेटरी पराग फुकणे, बाबासाहेब माने,मुबंई येथील संस्कार सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पिंकीताई पाटील,कार्यध्यक्ष सूर्यकांत गावणकर, डॉ. इरकेश पांडे, विकी रामाणे, तसेच लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे डॉ. अनिरूद्ध तेली, प्रणिता कुटे, कृपाली कांबळे, श्रद्धा म्हात्रे, कमलाकर पाटील आदी मान्यवरांसह मंडळाचे संस्थापक अनंत सानप, माजी सरपंच संजय मांडलुस्कर, उपसरपंच विठ्ठल पवार, डॉ. सागर सानप, डॉ. सुजीत दिसले, डॉ. समीर दिसले,युवा कार्यकर्ते सुनील दळवी, हरिश्चंद्र कदम, चंद्रकांत लहाने, शशिकांत दिसले, उदय कदम, बबन दळवी, चंद्रकांत फाटे, विठोबा सानप, शेखर कदम, राकेश महाडिक, दत्ताराम जोशी, सुभाष दिसले, राजू लहाने, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाराम दळवी, दिनकर सानप, सचिन दिसले, शरद दिसले, मंगेश सानप, विश्वास लहाने, संदीप शिर्के, लक्ष्मण पवार, शशिकांत लहाने, सुचित भुरूक, नितिन साठे, विलास फाटे, सूरज साळवी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला व आदी नेत्र रुग्ण बहुसंख्येने उपस्थित होते .

सामाजिक आणि काल्पनिक उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाने राबविलेल्या नेत्रचिकित्सा व शिरातंर्गत नेत्ररूग्णांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या नेत्र तपासणी प्रसंगी राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री ना आदितीताई तटकरे, रोहा प्रांताधिकारी डॉ यशवंत माने,डॉ मंगेश सानप ,संजय राजीवले,सर्कलधिकारी सचिन काटे, कोलाड तलाठी सजाचे तलाठी हिंदोळे,राकेश शिंदें सह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी भेट देत श्री क्षेत्रपाल मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ पुई यांच्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा व सदिच्छा देऊन त्यांचे कौतुक केले .

सदर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सागर सानप यांनी तर सुत्रसंचलन नंदकुमार मरवडे यांनी केले तर दिनकर सानप यांनी आभार व्यक्त केले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.