Press "Enter" to skip to content

आदिवासी महिलांना शेळ्यांचे वाटप : दीपक फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

दीपक फाऊंडेशन मार्फत उद्योजिका प्रकल्पातंर्गत आदिवासी समाजातील महिलांना स्वरोजगार निर्मितीसाठी मोफत शेळ्यांचे वाटप करण्याचा
कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

धानकान्हे व तळवली तर्फे आदिवासी वाड्यांवरील महिलांना सदरचे शेळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.यावेळी प्रकल्प समन्वयक अजय अवाडे,प्रिती जवरत,सामाजिक कार्यकर्ते रघूनाथ कोस्तेकर,सुरेश वाघमारे,सुवर्णा वाघमारे,सुप्रिया तुपकर, साईनाथ राठोड आदींसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सामाजिक बांधिलकीचे नात्यातून दीपक फाऊण्डेशनचे वतीने गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले जात आहे. त्याच अनुषंगाने गावोगावी फिरत्या दवाखान्याद्वारे रूग्ण सेवा करणे हे एक त्यांचे कार्य क्षेत्राचे वैशिष्ट्ये असल्याने याचा लाभ खेड्यापाड्यातील गरजू रूग्णांना चांगला मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दीपक फाऊण्डेशनचे वतीने आदिवासी माताभगिनींना स्वयंरोजगाराचे द्रुष्टीने शेळीपालन करण्यासाठी शेळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती फाऊण्डेशनचे वतीने देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.