Press "Enter" to skip to content

महिला अत्याचाराविरोधात”सक्षम ती” कार्यक्रम उत्साहात

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून, युवासेवा फाउंडेशन आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या सहकार्याने, युवासेना सचिव वरून सरदेसाई आणि शिवसेना सचिव सुरज चव्हाण ,ज्योतीताई ठाकरे (अध्यक्षा, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य) आणि शीतलताई देवरुखकर (सिनेट सदस्या मुंबई विद्यापीठ, युवासेना कार्यकारिणी सदस्या) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.

यावेळी युवासेना जिल्हा विस्तारक राहुल लोंढे, महिला संपर्क संघटक भारतीताई गावकर, किरणताई चेंदवणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, तालुका संघटक प्रभामामी सुर्वे, युवासेना जिल्हा अधिकारी धनंजय मोहिते, जिल्हा सचिव भूमिष सावे, जिल्हा समन्वयक विराज पाटील, उपजिल्हाधिकारी रोहन चव्हाण, विधानसभा अधिकारी रोहन शिरीष चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख मनीष वैद्य, उपतालुका संघटक वैशाली कदम, महिला शहर संघटक श्रद्धा जाधव, शहर समन्वयक नांदविकर, सर्व शहर पदाधिकारी शिवसेना, महिला आघाडी, युवासेना आणि युवतीसेना उपस्थित होते.

दरम्यान या अभियानामध्ये प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी २५०हून अधिक महिला शेवटच्या क्षणापर्यंत उपस्थित होत्या. वरिष्ठांनी आणि पोलीस अधिकारी यांनी स्त्री अत्याचारा विरोधात समुपदेशन केले. अश्विनी चव्हाण (शिवसेना सोशिअल मीडिया समन्वयक, महाराष्ट्र राज्य) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.