चतुरंग रागा २०२१ शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपन्न
श्रीनिवास काजरेकर
पनवेल दि. १ः प्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून “चतुरंग रागा २०२१” या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले. ‘चतरंग गावो गुनी सब मिलकर’ या घोषवाक्याने नटलेला हा कार्यक्रम रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा संपन्न झाला. या कार्यक्रमात मधुवंती, बिहाग, बागेश्री, सोहनी अशा रागातील, बडा ख्याल, द्रुत बंदिश, तराणे व अभंग आठ गायकांनी सादर केले. ज्येष्ठ गायक पं. मिलिन्द गोखले, वीणा कुलकर्णी, मंदार भिडे, मधुरा सोहनी, संध्या घाडगे, वर्षा सहस्रबुद्धे, अनिल खोसरे, गणेश गोंधळी या गायक कलाकारांनी आपल्या मधुर गायनाने उपस्थित रसिक पनवेलकरांची मने जिंकली. अनंत कर्वे यांनी संवादिनी, किशोर पांडे यानी तबला व धनंजय खुटले यांनी पखवाज साथ केली. सुप्रिया ताह्मनकर यांनी अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
यावेळी पं. मेघनाथ कोल्हापुरे, अनिता कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, रमेश गोंधळेकर, प्रभाकर आघारकर या ज्येष्ठ गायक व वादक कलाकारांचा सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायक डॉ. मोहन दरेकर, भजनी कलाकार चंद्रकांत मने, गायिका रेणुका दलाल, पद्मजा कुलकर्णी, तबलागुरू रेवनाथ भाग्यवंत, विनायक प्रधान, श्रीकांत पोवळे आदी मान्यवरांसह पनवेलकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment