Press "Enter" to skip to content

रिक्षा चालकांच्या डोळ्यांची काळजी घेणारी दहा वर्षीय अविरत काम”गिरी”

सिटी बेल लाइव्ह । उरण । वार्ताहर ।

आपण ज्या मातीत जन्माला आलो ज्या समाजात लहानाचे मोठे झालो,त्या समाजाचे आपण काहीतरी देणेकरी लागतो अशा सद्भावनेने नेत्ररोग तज्ज्ञ डॉ अमोल सुखदेव गिरी हे गेली दहा वर्षे उरण शहरातील अनेक रिक्षा चालकांच्या डोळ्याची काळजी अविरतपणे आपल्या शहरातील व्हिजन आय हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारची फि न आकारता काँम्प्युटरव्दारे परिपूर्ण नेत्र तपासणी करून करत आहेत.त्यांच्या या समाजाभिमुख कार्याबद्दल डॉ अमोल सुखदेव गिरी यांची ओळख ही रिक्षा चालकांच्या डोळ्याची काळजी घेणारी दहा वर्षीय अविरत काम” गिरी” म्हणून सध्या जन माणसात निर्माण झाली आहे.

उरण तालुक्यातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ अमोल सुखदेव गिरी व त्यांची पत्नी डॉ सविता अमोल गिरी ( त्वचारोग तज्ज्ञ ) हे आपल्या उरण शहरातील व्हिजन आय हॉस्पिटल व स्किन केअर क्लिनिक च्या माध्यमातून आपला वैद्यकीय व्यवसाय जुन्या एसटी स्टँड समोरील करंजा रोड उरण शहरात गेली अनेक वर्षे करत आहेत.या त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढत डॉक्टर गिरी दांपत्य हे तालुक्यात आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरात हिरीरीने सहभाग घेत आहेत.तसेच गेली दहा वर्षे अविरत पणे आपल्या शहरातील अनेक रिक्षाचालकांच्या डोळ्यांची काळजी ही कोणत्याही प्रकारची फि न आकारता काँम्प्युटरव्दारे परिपूर्ण नेत्र तपासणी करून घेत आहेत.

त्याच्या या समाजाभिमुख कार्याबद्दल डॉ अमोल सुखदेव गिरी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या पुथ्वी तळावरील सुष्टीच दर्शन घेण्याचे काम आपले डोळे करत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकानी आपल्या डोळ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्या डोळ्यांची तपासणी ही वेळोवेळी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घेणे गरजेचे आहे.त्या अनुषंगाने आम्ही नागरीकांबरोबर विद्यार्थी,रिक्षा चालकांच्या डोळ्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेत आहोत.डॉ अमोल सुखदेव गिरी यांच्या या समाजाभिमुख कार्याबद्दल रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष जयराम पाटील, महेश पाटील, सुभाष माळी सह इतर रिक्षा चालकांनी ही समाधान व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.