सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
महिला वर्गांना विविध उपक्रमात सहभाग होता यावे,ह्या दृष्टीकोणांतून श्री शारदा अभिनव प्रक्रिया सह संस्था मर्यादित यांच्या माध्यमातून हळदि कुंकवाचे आयोजन लोधिवली येथे घेण्यात आले.यावेळी देशी गाई वाचविण्याचा संदेश देण्यात आले.गाईचे संवर्धन करा कारण ती आपली गो माता आहे.त्याच बरोबर ती आपल्यासाठी किती लाभदायक आहे.यांचे महत्त्व पटवून सांगितले कारण ज्या ठिकाणी हळदी कुंकू घेण्यात आले त्याच ठिकाणी गो शाळा असल्यामुळे त्यांचे संगोपन कसे होते यांचा आभ्यास यावेळी महिला वर्गांनी अनुभवला.
विशेष म्हणजे या संस्थे मध्ये महिला वर्ग असून सर्व कारभार महिला वर्ग पाहत आहे.आजच्या धावपळीच्या जिवनात महिला वर्ग एकत्र येणे शक्य होत नाही.मात्र हळदि कुंकू तसेच काही कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला वर्ग एकत्र आल्या यावेळी संगित खुर्ची,फुगडी,नृत्य आश्या विविध खेळ खेळण्यात आले.विशेष म्हणजे या खेळासाठी मोल्यवान तसेच गृहपयोगी वस्तू बक्षिस म्हणून ठेवण्यात आले होते.आज घर सांभाळता तारेवरची कसरत करावी लागत आहे.मात्र महिला वर्ग आज शिक्षणात पुढे आहे.शिवाय कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडत आहे.

मुलांचे शिक्षण समवेत संसार सांभाळण्याचे मोठे धाडस तिच्या मध्ये निर्माण झालेले असते.शिवाय कौटुंबिक जिवन जगत असतांना विविध समस्या येत असतात. मात्र त्यास न डगमगता त्या आपले काम यशस्वी पणे करत असतात.असे मार्गदर्शन सचिव अनघा आमले,यांनी या समारंभात व्यक्त केले.
यावेळी श्री शारदा अभिनव प्रक्रिया सह संस्था मर्यादित अध्यक्षा आश्विनी पिंगळे,उपाध्यक्ष – मंदा कुरुंगळे, कार्याध्यक्षा – मनिषा साळुंखे,सचिव अनघा आमले,सहसचिव – संजना दळवी,खजिनदार- निलम शिंदे, सहखजिनदार – स्वप्नानी दिसले,सद्स्यां सुषमा मुंढे,मोनिका जाधव,ज्योती बुरुमकर,रिया मोरे, या कार्यक्रमास ह्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले.
चौकट : या संस्थे च्या माध्यमातून आम्ही महिला वर्गास सहकार्य करण्यासाठी सज्य आहोत महिला स्वावलंबी व्हावे यासाठी आम्ही बचत गटास सहकार्य करून तुम्ही तयार केलेल्या वस्तू विक्री साठी प्राधान्य दिले जाईल
संजना आमले
श्री शारदा अभिनव प्रक्रिया सह संस्था मर्यादित सह सचिव
चौकट : महिला वर्ग सक्षम होण्यासाठी आम्ही महिला एकत्र ऐवून या संस्थे ची स्थापना केली आहे.महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे हाच त्या मागिल उद्देश आहे
सुषमा मुंढे - श्री शारदा अभिनव प्रक्रिया सह संस्था मर्यादित सद्स्या








Be First to Comment