सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व मनसे सैनिक विनायक तेलंगे व नरेश भंडारी यांच्या विशेष मेहनतीने नागोठणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना कार्यालयाची स्थापना होत असून आज रविवार दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता या कार्यालयाचे उदघाट्न मनसे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
नागोठणे येथील रामनगर येथे या कार्यालयाची स्थापन होणार असून यावेळी युनियन फलकाचे अनावरण, कार्यालयाचे उदघाट्न, कामगारांना माथाडी ओळखपत्र, कामगारांना चार लाख रुपयांच्या विमा प्रमाणपत्राचे वाटप तसेच कामगारांना टी-शर्ट वाटप व तरुणांचा पक्षप्रवेश आदी कार्यक्रम मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार असल्याची माहिती मनसेचे नागोठणे विभागीय नेते विनायक तेलंगे व नरेश भंडारी यांनी दिली.
या कार्यालयाच्या उद्घाटनापुर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर हे मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी यांच्या येथील “शिवराज सदन” या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार असल्याचे गोवर्धनभाई पोलसानी यांनी सांगितले.








Be First to Comment