तळा तालुका राष्ट्रवादी पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नानासाहेब भौड यांचा सत्कार
सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रायगड जिल्ह्याचे खा.सुनील तटकरे यांच्या क्रुपाशिर्वादाने तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड करण्यात आलेल्या नानासाहेब भौड यांचा पढवण-वाली पंचक्रोशी शिक्षण. मंडळाकडून त्यांच्या निवासस्थानी हृदय सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित तळा तालुका राष्ट्रवादी पक्ष अध्यक्ष माननीय श्री. नानासाहेब भौड हे पढवण-वाली पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान चेअरमन आहेत.त्या प्रित्यर्थ त्यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला आहे. नानासाहेब भौड यांनी आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात पढवण ग्राम पंचायतीच्या सरपंच पदापासून केली. अगदी तरुण वयातच ग्रामीण जीवनातील अनेक समस्यांना जवळून पाहता आल्यामुळे जनसामान्यांना काय हवे काय नको याची पूर्ण कल्पना असल्याने जनतेचा आपला हक्काचा कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. तर खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीने प्रेरीत होऊन, राष्ट्रवादी पक्षाचे कार्य
करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याने तळा तालुका पं.स. सभापती आणि सदस्यत्वपद नानासाहेब भौड यांनी भुषविले आहे. ते स्वभावाने अत्यंत मृदु व मनमिळाऊ असल्याने जनसामान्यांमध्ये आणि कर्मचारी वर्गात त्यांना मानाचे तसेच आदराचे स्थान निर्माण केले आहे.
पढवण-वाली प. शि. प्र. मंडळाच्या स्थापनेपासून नानासाहेब भौड यांनी संस्था हितासाठी आपले जीवन खर्ची घातले आहे. त्यांच्या त्यागाला कशाचीच उपमा देता येणार नाही. सत्कार सोहळ्यावेळी संस्था पदाधिकारी व संस्था विद्यालयाच्या कर्मचारी वृंदावनी आपले मनोगत व्यक्त करताना नानासाहेब भौड यांच्या पुढील राजकीय जीवनासाठी अनेक शुभेच्छांचा वर्षाव केला.सदर सोहळ्यास संस्था उपाध्यक्ष मनोहर जाधव, सचीव कोतवाल साहेब,सचीव श्री. भौड सर खजिनदार साधुराम पिंपळे, बांधकाम सभापती जनार्दन भौड , सदस्य दत्तात्रेय ठाकर, संस्था विद्यालयाचे मुख्याध्यापक बळीराम चव्हाण,संजीव शेरमकर व पढवण विद्यालयाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.








Be First to Comment