Press "Enter" to skip to content

आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकार हरिचंद्र महाडिक यांचा सत्कार

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधून आंबेवाडी ग्रामपंचायतिच्या वतीने सुतारवाडी येथील नामवंत पत्रकार हरिचंद्र महाडिक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खा.सुनिल तटकरे, राज्यमंत्री तथा रायगडच्या पालक मंत्री आदिती तटकरे,आ. अनिकेत तटकरे, आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेश महाबळे,यांच्या शुभेहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पत्रकार हरिश्चंद्र महाडिक हे महाराष्ट्र टुडे या न्यूज चैनलचे रायगड जिल्हा प्रतिनिधी असून ते अनेक वर्षापासून रायगड टाइम्स,सागर,कृषिवल,तसेच अनेक वृत्तपत्रातून जनतेच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवत असून त्यांचा आनंदनगरी कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.परिसरातील विविध घडामोडी प्रमाणे सामाजिक बातम्या आज तागायत प्रसिद्ध होऊन शासन दरबारी त्यांच्या बातम्यांची दखल घेऊन सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल त्यांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.तसेच समर्थन या सेवाभावी संस्थेने २००२ मध्ये शिर्डी येथे तत्कालीन मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते पत्रकारितेमधील स्कॉलरशिप दिली. आज तागायत त्यांनी रस्ते,वीज पुरवठा,शैक्षणिक,तसेच एसटीचा अनियमितपणा अशा समाजाला भेडसावणाऱ्या समस्या वृत्तपत्रातून मांडून समाजाला अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचे चांगले कार्य केले आहे.तसेच शिक्षक सेवेतून निवृत्त झाले आहेत यामुळे त्यांच्या आंबेवाडी ग्रामपंचायतिच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्काराबद्दल पत्रकार तथा संपादक मनोज घोसाळकर,पत्रकार डॉक्टर श्याम भाऊ लोखंडे, पत्रकार विश्वास निकम,पत्रकार भिवा पवार तसेच त्यांचे मित्र परिवार यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.