सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
गेली अनेक महिने मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी ही सेवा ती सेवा अमुक ऑफर तमुक ऑफर टू जी थ्री जी फोर जी एवढे दिवस तेवढे दिवस आशा ऑफरवर ऑफर देऊन अक्षरशः लूट माजवली असल्याचे समोरे येत आहे .
या विषयी सविस्तर माहिती अशी की, मागील आठवडाभर रोहा तालुक्यात सर्वच ठिकाणी आयडीया,वोडाफोन, या मोबाईल सेवा व इंटरनेट सेवेचा अक्षरशः खेळखंडोबा तसेच ही सेवा कोलमडली असून एक ना धड भराभर चिंध्या अशी अवस्था या कंपनीने ग्राहकांची करून ठेवली आहे या सेवेवरून कुठेही कॉल करा नॉटरीचेबल शिवाय काही इंटरनेटचा पत्ताच नाही तर एका मोबाईल वरून आठ ते दहा वेळा पुन्हा पुन्हा नंबर डायल कराल तेंव्हा एकदा कॉल होतो त्यातच एक दुसऱ्याच आवाज एकमेकांना पोहच नाही त्यामुळे ग्राहक वर्गात एकच संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या बदलत्या युगात मानवाला मोबाईल अतिप्रिय झाले असल्याने मोबाईल टॉवर अथवा त्याची रेंज गेल्याने काही महत्वाचे कॉल अथवा ऑनलाईन काम करता येत नाही काही ग्राहकांच्या महत्वाच्या कामा प्रसंगी मोबाईल सेवा नॉटरीचेबल झाल्याने संताप होत असतो परंतु तालुक्यात गेली काही दिवस या दोन्ही कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने रिचार्ज च्या नावाखाली केवळ ग्राहकांची लूट होत असल्याचा संतापजनक सवाल ग्राहक वर्गातून व्यक्त केला जात आहे त्यामुळे आता बाजारात ग्राहक एरटेल व जिओ कंपनीच्या सिमला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे .







Be First to Comment