Press "Enter" to skip to content

आपट्यात दुकाने व मंदिरातील दानपेटी फोडून २८,४०० रुपयांची चोरी

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

आपटा गावातील दुकानांचे गाळे व दत्त मंदिरातील दानपेटी फोडून एकूण २८,४०० रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची घटना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मौजे आपटा गावातील एकविरा, माऊली इलेक्ट्रीक अॅण्ड हार्डवेअर शेजारील असलेल्या गालाधारक यांचे शटर कोणत्यातरी लोखंडी वस्तूने वाकवून त्यावाटे आत प्रवेश करुन तसेच गावातील श्रीदत्त मंदिरातील मंदिराच्या दरवाज्याचा कोयंडा तोडून त्याद्वारे आत प्रवेश करुन मंदिरातील दानपेटी फोडून चोरी झाल्याची फिर्याद अशोक गणपत काठे (वय २०) यांनी केली आहे.

यात अज्ञात चोरटयांनी आपटा दत्तमंदिरातील स्टीलची दानपेटी फोडून २००० रुपये,गाला नंबर १ दुकानातील काऊंटर ड्राव्हरमधील रोख रक्कम १०४००,गाला नंबर २ दुकानाच्या काऊंटर ड्राव्हरमधील रोख २०००,गाला नंबर ३ काऊंटर ड्राव्हरमधील १००० रुपये,गाला नंबर ४ ड्राव्हरमधील ६५०० रुपये,गाला नंबर ५ ड्राव्हरमधील रोख ३००० रुपये,गाला नंबर ७ ड्राव्हरमधील ३००० रुपये असा एकूण २८४०० रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाले.

याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात भादवि कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.के.अहिरे अधिक तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.