रोहा पंचायत समिती माजी उपसभापती विजया पाशिलकर यांची विशेष उपस्थिती
सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।
रोहा तालुक्यातील यशवंत ग्रामपंचायत धाटावच्या वतीने कार्यालयात महिलांसाठी सौभाग्याचे वाण म्हणून हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रोहा पंचायत समिती माजी उपसभापती विजया पाशिलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी हजारो महिलांनी सुहासिनीचे वाण घेऊन आपला आनंद द्विगुणित केला आणि एकमेकींना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्हा महिला अध्यक्षा दिपिका चिपळूणकर सरपंच सुवर्णा रटाटे,माजी सरपंच प्रभावती जाधव,वर्षा पाशिलकर, वैशाली पाशिलकर,रसिका पाशिलकर पूनम पाशिलकर,लिलावती रटाटे,सोनल मोरे,विदया जंगम, रुपाली जंगम,श्रद्धा रटाटे आदी मान्यवर उपस्थित होत्या.
महिलांसाठी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिला सक्षमीकरणा विषयी बोलताना दीपिका चिपळूणकर यांनी सांगितले की महिलांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते,त्यांनी त्यातून मार्ग काढावयास पाहिजे.महिलांनी सकारात्मक विचार करावयास पाहिजे. महिलांनी चुल व मुल पर्यंतच मर्यादित न राहता सावित्रीबाईंचा आदर्श नजरेसमोर ठेऊन आपआपले क्षेत्र निवडून त्या त्या क्षेत्रात प्रगती करायला हवी.महिलाचे सबलीकरण आणि सक्षमीकरण झाल्या तरच त्या आपला विकास करू शकतात असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे नियोजन ग्रामविकास आधिकारी दीपक चिपळूणकर,सरपंच सुवर्णा रटाटे,उपसरपंच यशवंत रटाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदस्या कल्पना मोरे,शुभांगी माने,सुप्रिया मोरे,सुविद्या भोकटे,.नेहा भोकटे,मंदा वाघमारे,रचना साळुंखे,उत्तरा म्हसकर,शितल जाधव तसेच ग्रा.पं.महिला कर्मचारी प्रज्ञा रटाटे, ज्योती धोंडगे यांनी मेहनत घेतली.धाटावसह विष्णुनगर,बारसोली, मळखंडवाडी,आदिवासीवाडी,महादेववाडी आदी परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हळदी कुंकू कार्यक्रमात सुहासिनीचे वाण घेऊन आनंद द्विगुणित करून एकमेकींना शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment