बेकायदेशीर खैराची वाहतूक करणारा टेम्पो मुद्देमाला सह जप्त : रोहे वन भरारी पथकाची कारवाई
सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।
मुंबई गोवा महामार्गावर खैर वाहतुक तस्करीचा रोहे वन भरारी पथकांनी पर्दाफाश केला असून टेंबे वाडी वीर जवळ बेकायदेशीर खैराची वाहतूक करणारा टेम्पो व त्यातील खैर सोलिव जप्त केला आहे. हप्त्या भरातील ही वन विभागाची दुसरी कारवाई असून, या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सायंकाळी ०५:१० वाजता मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन फिरते पथक रोहा यानी विनापरवाना खैर सोलिव मालाची वाहतूक करणारी टाटा 1512 वाहन क्रमांक MH-03-CV-4997 मौजे टेंबे वाडी वीर, मुंबई गोवा रस्त्यावर पकडून खैर तस्करीचा पर्दाफाश केला आहे. यात आरोपी १) सेफत इसाक खान(वाहन चालक)रा.उत्तर प्रदेश,२)हबिब सिद्दीकी(मालक) रा.गोवंडी मुंबई ३)सलमान रा.वापी गुजरात वाहनामध्ये खैर सोलीव, किटा घमीं.१६.०००किंमत.०१,९४,१३७/- रूपये व टाटा १५१२टेम्पो वाहन किंमत १५,००,०००/- रुपये असे एकूण एकंदर १६,९४,१३७/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भारतीय वन अधिनियन १९२७ चे कलम २६(१) फ,४१(२ब),४२अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुढील तपास वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा इच्छांत कांबळी, वनरक्षक फिरते पथक रोहा श्री अजिंक्य कदम ,वनपाल फिरते पथक रोहा श्री आर.जी.पाटील.तसेच परिमंडळ स्टाफ दासगाव हे करीत आहेत.








Be First to Comment