Press "Enter" to skip to content

७२ व्या प्रजासत्ताकदिनी धाटावमधे राष्ट्रध्वजाला मानवंदना

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।

   भारताचा ७२ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा करण्यात आला.रोहयात धाटावमधे केंद्रीय शाळा,परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले हायस्कूल,यशवंत ग्राम पंचायत कार्यालयात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.यासमयी विद्यार्थीवर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    याप्रसंगी धाटाव ग्रां.पं.मधे सरपंच सुवर्णा रटाटे,परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले हायस्कूल मधे माजी सरपंच विजयराव मोरे तर,केंद्रीय शाळेत उपसरपंच यशवंत रटाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रगीत,समुहगीत,राष्ट्रपरगित सादर करण्यात आली.दरम्यान भारतीय प्रजासत्ताक दिनाबद्दल व संविधान, घटनेवर आधारित मुख्याध्यापिका दीप्ती भोईर,तलाठी तुंबरे तर शिक्षक पारटे यांनी आपले मत व्यक्त केले.याप्रसंगी प्रास्तावीक दीपक चिपळूणकर यानी केले.

याप्रसंगी विनोद पाशिलकर,अशोक मोरे,महादेव रटाटे,कृश्णा रटाटे,कैलास पवार,चंद्रकांत जाधव,यासह सर्व ग्रा.पं. सदस्य,सदस्या,आरोग्य अधिकारी,मुख्याध्यापिका,शिक्षक वर्ग,ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूनकर,कर्मचारी वर्ग,विद्यार्थी,विद्यार्थिनी व तरुण,महिला नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.     

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.