सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
दिल्ली येथे पार पडलेल्या पॉवर लिफ्टिंग मध्ये डेड लिफ्टिंग व बेंच प्रेस स्पर्धेत कर्जत मधील काका फिटनेस सेंटरचा सदस्य बबन झोरे यांनी चार सुवर्ण पदके पटकावली आहेत, त्यामुळे बबन झोरे यांनी आपल्या गावाचे नाव व काका फिटनेस सेंटर चे नाव दिल्लीच्या राजधानीमध्ये झळकवले आहे.
खालापूर तालुक्यातील चौक येथील वाघेश्वर या छोट्याशा गावातून कर्जत मध्ये काका फिटनेस सेंटर मध्ये जिम करणारा बबन झोरे दिल्ली झालेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत राजस्थान, तामिळनाडू, गुजरात, नवी दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आदी राज्यातून 600 खेळाडू उतरले होते. 59 किलो वजन गटाच्या स्पर्धेत डेड लिफ्टिंग मध्ये 200 किलो वजन उचले तर बेंच प्रेस मध्ये 115 किलो वजन उचलले आणि या स्पर्धेत 4 सुवर्ण पदकांचा मानकरी ठरला आहे.
कर्जत मधील काका फिटनेस चे नाव दिल्लीच्या राजधानीत करणाऱ्या जिमचा सदस्य बबन झोरे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, यावेळी व्यासपीठावर कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण भोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू अल्लाट, पोलीस उपनिरीक्षक संदीपपान सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, उद्योजक राजू मोरे, माजी नगरसेवक संतोष पाटील, वरई चे सरपंच सुरेश फराट आदी उपस्थित होते.
काका फिटनेस सेंटर चे चालक अमित गुप्ता यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर जिमचे सदस्य चार सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेले बबन झोरे यांचा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक अरुण ओर यांनी बबन झोरे यांनी देशपातळीवर नाव कमवले असून त्यापुढे बबन चा बबनराव अशी त्यांची ओळख आपण सर्वांनी ठेवली पाहिजे असे सांगितले. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी बबन झोरे यांनी गरीब परिस्थितीत दुधाचा व्यवसाय करून अत्यंत कठोर मेहनत घेऊन जिद्दीच्या जोरावर आपल्या कर्जत चे नाव दिल्लीच्या राजधानीवर नेऊन पोहचवले त्याचे मनापासून कौतुक केले.
सत्कारा नंतर बोलताना बबन झोरे यांनी जिम चे मालक मयूर जोशी आणि चालक अमित गुप्ता हे माझ्याकडून फी घेत नाही उलट मला वेळोवेळी सहकार्य करतात त्याचे मी विशेष आभार मानेन तर माझ्याकडून मेहनत करून घेणारे माझे प्रशिक्षक संकेत देशमुख आणि केदार चौधरी यांच्यामुळेच मी स्पर्धेनंतर पोहोचू शकलो असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश बागवे यांनी केले.
याप्रसंगी प्रमोद अंबोरे, विजय गमरे, प्रशांत पाटील, अक्षय वर्धावे, धर्मेंद्र मोरे आदींसह सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment