सिटी बेल लाइव्ह । विकास पाटील ।
कोरोना महामारीचे संकट कमी होताच राज्य शासनाने 27 जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळेतील मुलांचे कोरोना पासून संरक्षण व्हावे व महत्वाचे म्हणजे आदिवासी मुलांच्या आरोग्याची काळजी घेताना पुनाडे गावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उरणचे उपाध्यक्ष श्री अनंत सदाशिव पाटील यांनी पुनाडे आदिवासी वाडी व पुनाडे शाळेस मास्क, साँनेटाझर, आँक्सीमीटर, व टेम्प्रेचर गणची भेट दिली त्यामुळे त्याचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
कोरोनाच्या महामारीत गावात येणे बंद केले असताना आदिवासी बांधवांसह पुनाडे गावातील गोरगरीब गरजू व निऱाधार महिलांवर उपासमारीची वेळ आली होती तेव्हा अनंत पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपताना आदिवासी बांधवाना अन्नधान्याचे वाटप केले होते त्याच बरोबर पुनाडे गावातही अन्नधान्याचे वाटप केले होते. पाटील हे सामाजिक कार्यात पुढे येत असून कोरोना कालात त्यांनी काहीना आर्थिक मदतही केली आहे. कोरोना महामारीत अनंत पाटील यांनी केलेले कार्य हे निश्चित कौतुकास्पद आहे ,अनंत पाटील नेहनीच सामाजिक बांधिलकी जोपासून पुनाडे आदिवासी वाडी व पुनाडे गावात कार्य करीत आले आहेत.








Be First to Comment