सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच ऍड. भार्गव पाटील यांच्यावरील अविश्वास ठराव आज ८ विरोधात २ मतांनी मंजूर करण्यात आला आहे. सरपंच ऍड. भार्गव पाटील हे जनतेतून निवडून आले होते.
पागोटे ग्रामपंचायतीत सरपंच भार्गव दामाजी पाटील, उपसरपंच सुमित चंद्रकांत पाटील, सदस्य मिलिंद केशव तांडेल, हर्षाली निलेश पाटील,
मिता किरण पंडित, कामिनी किरण तांडेल, वनिता जगदीश पाटील, रश्मी राकेश म्हात्रे, प्रदिप गोसावी पाटील, समिर दयाराम पाटील असे एकूण सरपंचासह १० सदस्यांचे संख्याबल आहे.
सरपंच ऍड. भार्गव पाटील यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर आज निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी गुप्त मतदान घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सरपंच १ व सदस्य ९ असे १० जणांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला होता.
यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने ८ तर अविश्वास ठरावाच्या विरोधात सरपंच व १ सदस्य अशी २ मते मिळाल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. गेली अनेक दिवस पागोटे ग्रामपंचायतीत अविश्वास ठरावाची चर्चा सुरू होती. त्यावर आज शिक्कामोर्तब होऊन सरपंच ऍड. भार्गव पाटील यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.








Be First to Comment