Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यातील एस.टी बस सेवा पूर्ववत करण्याची धर्मेंद्र मोरे यांची मागणी

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत तालुक्यातील सर्व एस.टी (बस सेवा ) पूर्ववत करण्याची मागणी तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

शासनाने राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिल्याने, कर्जत तालुक्यातील अनेक खेड्या-पाडयातून कर्जत शहरात बरेच विद्यार्थी येत असतात परंतु, त्या विद्यार्थ्याना खाजगी गाडीने ये-जा करण्यासाठी अव्वा च्या सव्वा पैसे मोजावे लागतात, तसेच गाव खेड्यातील शाळेमध्ये जाण्यासा साठी शिक्षकांना सुद्धा वेळेत जाता येत नाही. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कर्जत आगारात दिले,राज्य परिवहन कर्जत स्थानक प्रमुख. देवानंद मोरे यांना वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकारी सुनील गायकवाड, ता.सहसचिव राजू ढोले उपस्थित होते.

निवेदनात मागणी करण्यात आली की, कर्जत तालुक्यातील आपल्या आगरातून सर्व एस.टी (बस) सेवा पूर्वी प्रमाणे पूर्ववत करावी आणि मुलांची, शिक्षकांची,आणि सर्व सामान्य माणसाची होणारी गैरसोय आपल्या मार्फत थांबवावी.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.