Press "Enter" to skip to content

उरण सामाजिक संस्थेकडून स्मिता म्हात्रे यांचा सत्कार

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।

उरण तालुक्यातील माई ई सेवा केंद्र कोप्रोली च्या संचालिका सौ स्मिता म्हात्रे यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल उरण सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. त्यामध्ये माई ई सेवा केंद्र कोप्रोली मधील सर्व कर्मचारी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आदिवासी बांधवांचे आधार कार्ड काढणे सोपे नसून त्यांना प्रत्येक गोष्ट समजून सांगावी लागते, त्यांना सांभाळून घ्यावे लागते. आदिवासी बांधवांना प्रेमाची वागणूक देवून त्यांचे काम पूर्ण केले जाते.नेमके हेच काम स्मिता म्हात्रे यांनी केले असून स्मिता म्हात्रे यांनी आदिवासी बांधावांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करून उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

संतोष पवार यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष नाना गायकवाड , रुपेश पाटील, पंकज ठाकूर, रायगड भूषण दत्ता गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर,प्राध्यापक राजेंद्र मढवी देखील उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.