सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्याजवळील कोंडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या निडी गावातील राजिप शाळेच्या डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन नुकतेच प्रजासत्ताक दिनी कोंडगावचे सरपंच निखिल मढवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे निडी गावातील विद्यार्थी आता डिजिटल वर्गखोलीतून शिक्षण घेणार आहेत.
कोंडगाव ग्रामपंचायतीने १४ वा वित्त आयोगाच्या निधीतुन राजिप शाळा निडी तर्फे नागोठणे येथे सर्व सोयींनी उपयुक्त अशी डिजिटल वर्गखोली तयार करण्यात आली. याच डिजिटल वर्ग खोलीच्या या उद्घाटन प्रसंगी कोंडगावचे सरपंच निखिल मढवी यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य प्रणाली म्हात्रे, मधुकर मढवी, हरिश्चंद्र भोय, वामन मढवी, दत्तात्रय मढवी,सुभाष मढवी,मारुती मढवी, शिक्षक व निडी गावातील ग्रामस्थ यावेेळी मोठ्या संंख्येने उपस्थित होते.








Be First to Comment