सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । प्रतिनिधी ।
प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून श्री क्षेत्र विठोबा देवस्थान ट्रस्ट तर्फे सायकल हाफ एव्हरेस्टिंग – श्री. राम जोशी, श्री.दत्तात्रेय पोतदार , श्री.मकरंद नाईक , श्री. मनोज भगत , श्री. यश बसवराज व कुमार सात्विक रायकर , त्याचप्रमाणे भारतातील पहिले फुल एव्हरेस्टिंग करणारे अलिबाग सायकल क्लबचे द्रोणाचार्य श्री. सुमित पाटील या सर्वांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व प्रमाणपत्रासह सत्कार करण्यात आला .

यावेळी ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त श्री. रमेश भास्कर नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात , दैनंदिन जीवनात सायकलिंगचा वापर वाढणे ही समाजाची व वैयक्तिक आरोग्यासाठी गरज आहे हे सांगितले. यासाठी समाजाच्या प्रत्येक स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे यासाठी असे प्रोत्साहन देणारे कार्यक्रम राबविले पाहिजेत असे मत व्यक्त केले. याप्रसंगी ट्रस्टचे सदस्य श्री. उदय वार्डे , श्री. सुनील घरत , श्री. अनंत पडवळ , श्री. सुरेंद्र जोशी , श्री. प्रदीप वर्तक आणि सर्व सेवाभावी कार्यकर्ते उपस्थित होते . ट्रस्ट चे सदस्य श्री. अविनाश राऊळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले .









Be First to Comment