Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये दाऊदी बोहरा समाजाचे प्रथमच ध्वजारोहण

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दाऊदी बोहरा समाजाने प्रथमच त्यांच्या मशिदीच्या आवारात ध्वजारोहण केले.

कर्जत येथे समाजाचे प्रतिनिधी जनाब शेख मन्सूर भाई येमानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी भारत देशा विषयी आपले समाजाचे प्रेम व योगदान आणि आपली देशा प्रती असलेली कर्तव्ये समजावून दिली.

समाजाच्या धर्मगुरू सैय्यद ना मुफाद्दल सैफुद्दीन यांची शिकवण म्हणजे समाजात भाईचारा निर्माण करणे व देशाच्या हितासाठी नेहमी प्रयत्न करावे याची ही आठवण करून दिली.
याप्रसंगी बोहरा समाजाचे मुल्ला मुर्तझा धरिवाला, मुस्तफा धरिवाला, मुफड्डल दाभिया, अली असगर धरिवाला, इलियास कर्जत वाला, हुझैफा कर्जत वाला, हुजैफा धरिवाला, हैदर सालीब, डॉ.प्रभाकर काळे , डॉ.राहुल ओसवाल, इलियास मोमीन, दिनेश गणिगा उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.