Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र एअर गन स्पर्धेत रूजुता महादेव बुकम ठरली अव्वल

सलग दुसऱ्या वर्षी पटकावला प्रथम क्रमांक

मा आमदार विवेक पाटील यांनी केले अभिनंदन.

सिटी बेल लाईव्ह/ पनवेल.

महाराष्ट्र एअर गन स्पर्धेत रुजुता महादेव बुकम हिने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल येत प्रथम क्रमांक पटकावला.  महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांच्यावतीने जानेवारी २०२१ मध्ये महाराष्ट्र एअर गन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या देशात कोरोनाचे सावट असल्यामुळे यावर्षी ही स्पर्धा एकाच ठिकाणी न घेता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि पनवेल अशा सहा केंद्रावर ७ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान घेण्यात आली. एनआरएआय आणि एमआरएच्या नियमानुसार सदर स्पर्धा विविध राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर या स्पर्धा घेण्यात येतात.
        कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, यवतमाळ, रत्नागिरी, ठाणे,सातारा आदि ठिकाणच्या ४०० हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या सर्वांमधून पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स अकेडमी अंतर्गत लक्ष शूटिंग क्लबची रूजूता महादेव बुकम हिने प्रथम क्रमांक पटकावला. गेल्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला होता.४०० गुणांपैकी तब्बल 395 गुण पटकावत रुजूता हिने टार्गेट वेधले.कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये सध्या ती ऑलिम्पियन शूटर सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली शूटिंगचे धडे गिरवत आहे.
      ऋजुता हिच्या नेत्रदीपक यशाबद्दल कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी चे संस्थापक मा आमदार विवेक पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले आणि पुढील वर्षी प्रथम क्रमांकाची हॅट्रिक साधण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत रुजुता चे वडील तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल जिल्हा कार्यालयीन चिटणीस महादेव बुकम, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.