Press "Enter" to skip to content

प्रजासत्ताक दिनी सारडे विकास मंचतर्फे पुनाडे वाडी येथे कपड़े वाटप

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

सारडे विकास मंचतर्फे मास्टर स्नेहित रोहित पाटीलच्या वाढदिवसाच औचित्य साधत पुनाडे वाडीवर प्रजासत्ताक दिनी नवीन आणि जुने कपड़े वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

व्हाट्सएपच्या माध्यमातुन नवीन आणि जुन्या कपड्यांचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत बघता बघता एक टेम्पो भरेल एवढे कपडे जमा झाले होते. सदर कपड्यांचे वाटप प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पुनाडे वाडीवर वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी वशेणी गावचे माजी सरपंच प्रसाद पाटील, सह्याद्रि प्रतिष्ठानचे मावळे प्रतिश कोळी, अक्षय सामाजिक कार्यकर्ता विनायक गावंड, गोल्डन जुबलीचे अनिल घरत, नवनीत पाटील, पुनाडे वाडीवरिल शिक्षक भोपाले सर सहशिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच स्नेहीतचे वडील रोहित पाटील, आई स्नेहाताई पाटील, जोषणाताई पाटील, रिया म्हात्रे, सारडे विकास मंचचे उपाध्यक्ष संपेश पाटील, खजिनदार रोशन पाटील, सभासद मंगेश पाटील, कांतिलाल म्हात्रे, अल्पेश जोशी, नितेश पाटील, मिलन पाटील, अमर भोईर, धर्मा पाटील, परशुराम पाटील, वाडीवरिल जेष्ठ नागरिक बुवा आणि अनेक लहान थोर महिला भगिनी याच्या सर्वाच्या उपस्थित स्नेहितच्या वाढदिवस आणि कपड़े वाटप मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

कार्यक्रमा प्रसंगी उत्तम म्हात्रे यानी सारडे विकास मंचला दिलेल्या नोंद वह्या (डायरी) सर्व मान्यवरांना भेट दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.