Press "Enter" to skip to content

नागोठण्याजवळील अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

पोयनाड वरुन नागोठणे बाजूकडे येणाऱी स्विफ्ट कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात सौ. संतोष जितकुमार मेहता (वय ६२) या महिलेचा पोटात मुक्का मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात जीतकुमार रामप्रसाद मेहता (वय ६३) हे जखमी झाले असुन त्यांच्यावर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

हे दोघेही भिवली ता. मंढी जि.मंढी राज्य-हिमाचल प्रदेश येथील रहिवासी आहेत. हा अपघात २६ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नागोठण्याजवळील शिहू गावाच्या हद्दितील सुरक्षा नगर येथे घडला.

यासंदर्भात नागोठणे पोलिस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जीतकुमार मेहता हे आपली स्विफ्ट डिझायर कार पोयनाड ते नागोठणे या रस्त्यावरुन चालवित घेऊन जात असताना शिहू गावचे हद्दीत सुरक्षा नगर कॉलनीचे जवळ ते आले असता अचानक रस्त्यावर गाय समोर आल्याने तीला वाचवण्याकरीता मेहता यांनी गाडीला तत्काळ ब्रेक केला. त्यामुळे गाडी उजव्या बाजूला रस्त्याचे खाली जावून झाडावर आदळुन हा अपघात झाला.

याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात मोटार अपघात दाखल करण्यात आला असुन पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पो.ह. प्रमोद कदम हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.