सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला ग़गावणे, चाफेवाडी ते बंगालवाडी या सात वाड्यांना जोडणाऱ्या व पिढ्यानपिढ्या दुर्लक्षित असलेल्या रस्त्याचे लवकरच पक्के डांबरीकरण होणार आहे. या डांबरीकरणामुळे चाफेवाडी विभागाला चांगली दिशा प्राप्त होऊन विकासाचे एक नवे पर्व सुरू होणार असल्याचे मत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पेण तालुक्यातील व कुहीरे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम अशा चाफेवाडी येथे व्यक्त केले.
कुहिरे ग्रा.पं. हद्दीतील दुर्गम भागातील गंगावणे, चाफेवाडी, सरेवाडी, ओसलावाडी, वरणावाडी, धनगरवाडी व बंगालवाडी या सात गावांना जोडणा-या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सुमारे साडेपाच किलोमीटरच्या रस्त्याचे मजबुतीकरणासह डांबरीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा खा. सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कुहिरे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक रा. कॉ. जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, कुहिरे सरपंच सौ. प्रज्ञा वैभव जवके, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. गीताताई पालरेचा, रा. कॉ. नागोठणे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, पेण-पाली विधानसभा मतदार संघ अध्यक्ष नरेंद्र ठाकुर, पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, जिल्हा चिटणीस परशुरामशेठ मोकल, सुधाकर जवके, वैभव जवके, पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे, दिपेंद्र आवाद, पाटणसई ग्रा. स. सचिन कळसकर, नागोठणे ग्रा. स. अकलाख पानसरे, अतुल काळे, रोशन पारंगे, वणी उपसरपंच महेंद्र हंबीर, सुधाकर पारंगे, रोहा तालुका महिला अध्यक्षा अमिता शिंदे, नागोठणे शहर अध्यक्षा, सुजाता जवके, झोतिरपाडा सरपंच ज्योती तरे, वरूणा तरे आदींसह रा. कॉ. चे कार्यकर्ते व चाफेवाडी, गंगावणे वाडीवरील आदिवासी बांधव उपस्थित होते.
खा.सुनील तटकरे पुढे म्हणाले की, पिढ्यानपिढ्या हा विभाग कायमच दुर्लक्षित राहिला आहे. आता रस्त्याचे भूमीपूजन झाले आहे. येत्या दोन महिन्याच्या आतच पक्क्या डांबरीकरणाचे काम मार्गी लावले जाईल. तसेच चेराठी, काळकाई, गोयंडावाडी रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून मंजूर झाला असून ते कामही लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगून खा. तटकरे म्हणाले की, केवळ रस्त्याचा विकास झाला म्हणजे सगळे प्रश्न सुटले असे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून या विभागातील तरूणांसाठी रोजगाराची व उच्च शिक्षणाची संधी कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल यासाठी आपले शंभर टक्के प्रयत्न राहतील असे आश्वासनही खा. सुनिल तटकरे यांनी दिले. तर खेड्यापाड्यातील जनता किती सुसंकृत, किती जीव लावणारी व किती अंतःकरणाणे प्रेम करणारी असतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे चाफेवाडी व गंगावणे ग्रामस्थ, महिला व तरूण मंडळाचे कार्यकर्ते असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.उपाध्यक्ष उदय जवके यांच्या चांगल्या कार्याची प्रशंसा करताना उदय जवके यांच्या रूपाने नव्या विकासाचा उदय या चाफेवाडी विभागात होत असल्याचे शेवटी खा. तटकरे यांनी सांगितले.
सरपंच प्रज्ञा जवके यांनी आपल्या प्रास्ताविकात कुहिरे ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेस व आमचे लाडके नेते खा.सुनील तटकरे यांच्या माध्यमातूनच होऊ शकतो असा आमचा ठाम विश्वास असल्याने आम्ही कायमच खा.सुनील तटकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली.तर जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके यांनीही आपले व्यक्त करताना खा.सुनील तटकरे यांनी माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला नेहमीच मोलाचे सहकार्य करून राजकारणातील विविध पदांची जबाबदारी वेळोवेळी सोपविली असल्याने त्यांचे फार मोठे ऋण आमच्यावर असल्याची क्रुतज्ञपणाची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदकुमार मरवडे यांनी केले तर आभार उपसरपंच मनोहर पारधी यांनी व्यक्त केले.
तीस वर्षांपूर्वी उकल केलेल्या प्रश्नांची आजही उकल करण्यासाठी नियतीने माझी निवड केली – खा. तटकरे
१९८९-९० साली आयपीसीएल कंपनीतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा नौकरीचा प्रश्न मी पवार साहेबांच्या माध्यमातून सोडविला होता. आताही गेले साठ दिवस आंदोलन केलेले पूर्वाश्रमीची आयपीसीएल व आताची रिलायन्स कंपनीच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या नोकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी मला हस्तक्षेप करण्याची सूचना केल्यानंतर योग्य तो हस्तक्षेप खासदार या नात्याने करत रिलायन्स कंपनीला थोडेफार वाकवत आज दोनशे सव्वादोनशे कामगारांच मार्ग मला खुला करता आला याचा मला अभिमान वाटतो. गेल्या ३० वर्षांपूर्वी उकल केलेल्या प्रश्नांची आजही उकल करण्याची नियतीने माझ्या सारख्या कार्यकर्त्याची निवड केली याचा मला सार्थ अभिमान असल्याचे यावेळी खा. सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले.








Be First to Comment