नागरिकांचा प्रवास होणार सुखकर
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी पाताळगंगा परिसराची मोहोपाडा ही मुख्य बाजारपेठ आहे.मोहोपाड्याचे झपाट्याने शहरीकरण होत असल्याने शिवाय लोकसंख्येतही भरमसाठ वाढ झाल्याने मोहोपाडा बाजारपेठेतील गर्दीमुळे चालणे कठीण बनले आहे.मोहोपाडा प्रवेशद्वारासमोरून बाजारपेठेत प्रवेश करताना रस्त्यातील पेव्हर ब्लॉक बाहेर येऊन लहान-मोठे खड्डे झाल्याने बाजारातून प्रवास करताना एकप्रकारे तारेवरची कसरतच करावी लागते.
रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना प्रवास करताना नाहक त्रास होत असून या रस्त्यावर होत असलेल्या खडतर प्रवासामुळे अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी आदी व्याधींनी ग्रासले आहे.मोहोपाडा मुख्य प्रवेशद्वार कमानी ते गुरुकृपा स्टोअर्सं या तीस फुट रुंद आणि दिडशे मीटर लांबीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांनी महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे यांच्याकडे मागणी करुन गेल्या महिने पाठपुरावा केला होता.
यावेळी उमाताईनी या रस्त्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून मागणी केली आहे.
दरम्यान मोहोपाडा मुख्य प्रवेशद्वार कमानी ते गुरुकृपा या रस्त्याचे सोमवार दि.25 रोजी महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे यांच्याहस्ते उदघाटन करून रस्ता काॅक्रीटीकरणाचे काम सुरू केले आहे.मोहोपाडा बाजारपेठेतील हा मुख्य रस्ता असल्याने तो तीस फुट रुंद तर दिडशे मीटर लांब असणार आहे.

यावेळी महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे, सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर,माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे, माजी सरपंच भाग्यश्री पवार, जेष्ठ नागरिक तात्या म्हस्कर,माजी उपसरपंच दत्ता शिंदे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील,नंदकुमार पाटील, भालचंद्र राऊत, संदिप म्हात्रे, अमित शहा, विलास ओसवाल,वर्षां पाटील, अनिल पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मैदर्गींकर,मंगेश पाटील,स्वप्निल राऊत, संतोष पाटील, संदिप पाटील,अमोल गीध, आकाश जुईंकर,दिपक भंडारकर, विनायक मुंढे आदी उपस्थित होते.
माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांच्या प्रयत्नाने मोहोपाडा बाजारपेठ मुख्य प्रवेशद्वार ते गुरुकृपा या रस्त्याचे काॅक्रीटीकरण सुरू झाल्याने बाजारात येण्या जाणा-या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.कित्येक महिने या खोलंबलेल्या रस्त्याचे काॅक्रीटीकरणाचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी माजी सरपंच संदिप मुंढे यांचे आभार मानले.








Be First to Comment