Press "Enter" to skip to content

तंबाखूच्या सेवनामुळे वयाच्या विशीमध्येच दात खराब होण्याच्या प्रमाणात वाढ

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे अत्याधुनिक दंतविभागाची सुरुवात

सिटी बेल लाइव्ह । मुंबई । आरोग्य प्रतिनिधी ।

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी जगात ५५ लाख तर भारतात १० लाख नागरिकांचा मृत्यू होतो. देशात प्रौढ व्यक्तींमध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक असून आता हे लोन युवकांमध्ये पोहोचले असून वयाच्या विशीमध्येच दात खराब होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले असून याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरने आपल्या आरोग्य सुविधांचा विस्तार करीत अत्याधुनिक दंत आणि मॅक्सिलोफेसियल शस्त्रक्रिया विभागाचे नुकतेच उद्घाटन केले.

यामध्ये तंबाखूचे सेवन, हिरड्यांमधून रक्त, पायरोरिया आणि दुर्गंधी येणे, दात पिवळसर होणे, थंड दात, कुटिल दात बरे करणे, चेहऱ्याचा आघात, निओप्लाझिया, कुजलेले दात काढून टाकणे, दात भरण्याची सोय करणे आणि रोपण करणे यासारख्या सुविधांचा समावेश असून यावर होणाऱ्या विविध शस्त्रक्रिया सुद्धा होणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे व तेरणा समूहातील मान्यवरांच्या यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन या दंतविभागाचे उद्घाटन करण्यात आले.

डेंटल डीन डॉ. शिशिर सिंग, तेरणा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. सुनील पेटकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली नायक तसेच या दंतविभागाच्या प्रमुख दंतचिकित्सक डॉ पूजा अग्रवाल उपस्थित होत्या. या दंतविभागामध्ये दंत चिकित्सेसोबतच एन्डोडॉन्टिक्स. ऑर्थोडॉन्टिक्स, किमान हस्तक्षेप दंतचिकित्सा, प्रोस्थोडॉन्टिक्स,बालरोग दंतचिकित्सा, पीरियडॉन्टिक्स, मॅक्सिलोफेसियल शस्त्रक्रिया तसेच ओरल पॅथॉलॉजी या अत्याधुनिक दंतसेवा उपलब्ध असणार आहेत.

महाराष्ट्रात आढळणाऱ्या कर्करुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण तंबाखूचे सेवन करीत असल्याचे आढळून आले आहे. जगात १०० कोटी नागरिक तंबाखूचे सेवन व धूम्रपान करतात. त्यातील २५ ते २७ कोटी एकटय़ा भारतामध्ये असून हा आकडा लोकसंख्येच्या वाढीपेक्षा दहा पटीने वाढत आहे. शाळेत जाता-येताना मुले सर्रास गुटखा, तंबाखूजन्य सुपारी वा अन्य उत्पादनांचा आस्वाद घेतात, याची पालकांना सुतराम कल्पना नसते व लक्षणे दिसू लागतात, तेव्हा उशीर झालेला असतो.

मित्र-मैत्रिणींच्या दबावाला बळी पडून वा नैराश्यामुळे तंबाखू सेवन करणा-यांचा वर्गही मोठा आहे. भारतातील लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्क्यांच्या जवळपास लोक तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करतात. दात ही आपल्याला मिळालेली सर्वात सुंदर देणगी आहे व याचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे व त्यासाठी वर्षातून दोन वेळा आपल्या दातांची तपासणी करणे गरजेचे आहे अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रमुख दंतचिकित्सक डॉ पूजा अग्रवाल यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.