सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
32 व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, रसायनी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पाताळगंगा परिसरात “सडक सुरक्षा जीवन रक्षा”अभियानांतर्गत रसायनी वाहतूक शाखेचे संदिप पाटील, राकेश म्हात्रे व रायसिंग वसावे रस्ता सुरक्षा अभियान राबविताना दिसत आहेत.

याकरिता रस्ता सुरक्षा संबंधी एमआयडीसी ते चांभार्ली अशी जनजागृती बाईंक रॅली काढण्यात आली.या रॅलीत ईदिमुस्सु कंपनीच्या ५० बाईंक व ५ चारचाकींचा समावेश होता.या रॅलीत रसायनी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे, निवृत्त पोलिस निरीक्षक गो-हे, पोलिस मंगेश लांगी ईदिमुस्सू कंपनीकडून मॅनेजर अनिल घेवारी, असिस्टंट मॅनेजर स्वप्निला आंबेकर, कंपनी सुरक्षा अधिकारी भूषण दामले व इतर पोलिस कर्मचारी, रिक्षाचालक सहभागी झाले होते.यावेली रसायनी पाताळगंगा परिसरात वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्याहस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचे बॅनर लावून चौका चौकात रस्ता सुरक्षा संबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

सर्वांनी वाहतुकीचे नियम हे पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणासाठी नव्हे तर स्वता:साठी आणि कुटू़ंबासाठी पालावेत असे आवाहन करीत महामार्गांवर वाहन चालविताना सुरक्षितता कशी बालगावी यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.








Be First to Comment