सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
लाखो शिवसैनिक आणि कोट्यवधी हिंदूंचे दैवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 वा जन्मदिनानिमित्त रसायनी मोहोपाडा येथील मुख्य रस्त्यावरील शिवभोजन थाली कार्यालयात युवा सेना अधिकारी संतोष पांगत यांच्या वतीने गोरगरीबांना तीनशे किलो साखरेचे मोफत वाटप करण्यात आले.

मोहोपाडा रसायनी परीसरातील आदीवासी बांधव,नाका कामगार,गरजू गोरगरीबांना प्रत्येकी एक किलो साखरेचे किट मान्यवरांच्या हस्ते मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.यावेली रसायनी पाताळगंगा शिवसेना विभागप्रमुख अजित सावंत, शिवसेना माजी सभापती रमेश पाटील, माजी उपसभापती गजानन मांडे,माजी सरपंच निलम पाटील,माजी सरपंच भाग्यश्री पवार,माजी सरपंच रोशन राऊत, शाखाप्रमुख योगेश खाने, शिवसैनिक महेंद्र पांगत, अनंता पांगत, सतीश पांगत, बालासाहेब धांडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
युवासेना पदाधिकारी तथा कट्टर शिवसैनिक संतोष पांगत यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.यावेली उपस्थितांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली.
कोरोना नियमावलीमुळे शिवतीर्थावर जाणे अनेकांना शक्य होणार नसल्याने मोहोपाडा शिवसेना शाखा कार्यालयात शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यात आली.








Be First to Comment