Press "Enter" to skip to content

प्रज्ञावंत लक्ष्मीकांत पारनेरकर यांचा रसायनी दौरा

डॉ.पारनेरकर महाराज विद्यालय व सौ. विमलाताई पारनेरकर प्राथमिक विद्यालय वाशिवली येथे भूमिपूजन, नवीन वर्गखोल्यांचे व प्रयोगशाळेचे उदघाटन संपन्न

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

जीवन कला मंडळ रसायनीचे कार्याध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांच्याहस्ते डॉ. पारनेरकर महाराज मंदिराचे नूतनीकरण भूमिपूजन व प्रयोगशाळेचे भूमिपूजन करण्यात आले.यावेली पारनेरकर यांनी मोहोपाडा येथील संजय म्हस्कर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्या दर्शनासाठी व भेटीसाठी नागरिक उपस्थित होते.

एस.एच.केळकर कंपनी, बिर्ला हायटेक कार्बन कंपनी, अल्कील अमाईन्स कंपनी यांनी बांधून दिलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन कंपन्यांचे अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस जीवन कला मंडळाचे अध्यक्ष तुळशिदास पाटील व सरचिटणीस अनंता दळवी यांच्या हस्ते प्रज्ञावंत लक्ष्मीकांत पारनेरकर यांचे पुष्पहार घालून मंडळातर्फे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर व डॉ. विष्णु महाराज पारनेरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यानंतर मोहोपाडा येथील मोहोपाडा संजय म्हस्कर यांच्या निवासस्थानी प्रज्ञावंत लक्ष्मीकांतदादा पारनेरकर यांचा दर्शन व भेटीसाठीचा कार्यक्रम पार पडला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.