नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण स्थगित
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खराब झाल्यामुळे भिसेगाव मधील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते, मात्र हा रस्ता कर्जत नगरपरिषद हद्दीत असल्याने नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी रस्त्याचे काम एक महिन्याच्या आत सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी हे उपोषण त्यांच्या विनंतीला मान देऊन स्थगित केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्या खाली येत असलेल्या चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खराब झाल्यामुळे भिसेगाव मधील ग्रामस्थ रमेश किसन हजारे, दिनेश लक्ष्मण भरकले आणि अजित पांडुरंग राऊत यांनी दि.23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता भिसेगाव येथे उपोषण सुरू केले होते. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्या खाली येत आहे, मात्र रस्ता तांत्रिक अडचणी मुळे होत नसल्याने नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यहार करून रस्ते विकास योजने अंतर्गत कर्जत नगर परिषद हद्दीतील मंजूर झालेल्या कामाचे नाव श्रद्धा हॉटेल ते भिसेगाव चौक, भिसेगाव ते कर्जत चार पदरी पर्यंतचे रस्ता तयार करण्याऐवजी श्रद्धा हॉटेल ते चार पदरी रस्ता म्हणजे चार फाटा बदलून मिळण्या बाबत 5 ऑगस्ट 2020 रोजी पत्रव्यवहार केला होता.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्स्त्याचे काम अद्याप सुरू केले नाही, या खराब रस्त्यावरून वाहन चालविणे वाहन चालक याला जिकरीचे झाले होते.
म्हणून भिसेगाव मधील ग्रामस्थ यांनी उपोषणचा मार्ग अवलंबला तसा पत्रव्यवहार सार्वजनिक विभाग कार्यालय यांच्याशी केला.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने 19 जानेवारी रोजी उपोषणकर्ते यांच्याशी पत्रव्यवहार करून कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल हा रस्ता नगरपरिषद कर्जत त्यांच्या हद्दीत येत असल्यामुळे कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल हा रस्ता कर्जत नगरपरिषद यांच्याकडे व अर्ज करण्याबाबत नगर परिषद यांनी केलेल्या पत्रव्यवहार व रस्ता वर्ग करण्याबाबत नगरपरिषद यांच्यामार्फत ठराव मंजूर करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने प्रस्ताव अर्ज करण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे एम एम आर डी ए मुंबई यांच्यामार्फत कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल या रस्त्याच्या कामासाठी 5 कोटी इतका निधी कर्जत नगरपरिषद यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून त्या अनुषंगाने या कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीत आहेत असे सांगण्यात आले असून तरी आपण याबाबत नगरपरिषद यांच्याशी संपर्क साधावा व दि.23 जानेवारी रोजी आयोजित केलेले उपोषण करू नये अशी विनंती उपविभागीय अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी उपोषणकर्त्यांना पत्राच्या मार्फत केली होती.
उपोषणकर्ते याचं या पत्रावर समाधान झाले नाही अखेर आज दि.23 जानेवारी रोजी उपोषण सुरू केले यावेळी दुपारी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी उपोषणकर्त्याची भेट घेतली, यावेळी त्यांचा समवेत उपनराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका संचिता पाटील, स्वामिनी मांजरे, नगरसेवक बळवंत घुमरे, कर्जत नगररचना सहाय्यक लक्ष्मण माने, सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता कुणाल गोसावी उपस्थित होते.

नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी हा रस्ता नगरपरिषद हद्दीत असल्याने माझे बांधव उपोषणास बसले आहेत हे मला बरे वाटत नाही म्हणून मी त्यांना भेटावयास आले आहे असे सांगितले, अद्याप पर्यत हा रस्ता नगरपरिषद कडे वर्ग झाला नाही, मात्र याबाबाबत मी त्याचा पाठपुरावा करून निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक महिन्याच्या आत या रस्त्याचे काम सुरू करेन असा शब्द उपोषण कर्त्यांना दिला. कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिलेल्या शब्दाचा मान ठेवुन उपोषण कर्त्यांनी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते उसाचा रस पिऊन उपोषण स्थगीत केले.
यावेळी भाजपचे नेते रमेश मुंढे, दिपक बेहेरे,सरस्वती चौधरी, ग्रामस्थ सुरेश भरकले,राकेश देशमुख, जगदिश दिसले, प्रभाकर हजारे, पंढरीनाथ लबडे, मोहन भोईर, महेश भोसले, पोलिस पाटील संजय हजारे आदी उपस्थित होते.








Be First to Comment