Press "Enter" to skip to content

सौ.सनोबर गजगे करणार आमरण उपोषण

रोहा नगरपालिकेचा गलथान करभाराच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा

सिटी बेल लाइव्ह । रोहा । याकुब सय्यद ।

रोहा नगरपालिका कडे सौ. सनोबर सफदर गजगे यांनी मालकीच्या मालमतेस कर प्रणाली असेसमेट मध्ये त्याच्या नावाची नोंद करण्यासाठी ५फेब्रुवारी २०२० रोजी अर्ज केला होता. त्या अर्जास साधरण १ एक वर्ष पूर्ण होत आले आहे. या अर्ज निमित्त गेले वर्षभर रोहा नगरपालिकेच्या अधिका-याच्या संपर्कात असुन वेळेवेळी त्याना सहकार्य केले आहे परंतु,नगरपालिकेकडुन सुनवाणी घेण्यासाठी वारवार नोटीस काढण्यात आली आहे प्रत्येक वेळी काहीतरी थातुर मातुर निमित्त पुढे करायचे आणि वेळढकळुपणाचा कार्य करायचं आणि मला पूर्ण सूचना न देता सुनवाणी रद्द करायची गेले वर्षभरात नगरपालिकेच्या अधिका-याच्या संपर्कात असुन माझा अर्ज निकाली काढण्यासाठी कित्येक वेळेला लेखी तोंडी विनंत्या केल्या आहेत परंतु माझ्या अर्जावर कोणताही निर्णय न देता तोंडी कोर्टात जाण्यास सांगितले व जाणीव पूर्वक अर्ज निकाली काढण्यासाठी टाळाटाळ केली जाते याच कारणामुळे मला खुप मानसिक ञास झाला आहे,असे रोहा येथील मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची एक महिला सौ सनोबर सफदर गजगे याचे म्हणणे आहे.

रोहा नगरपालिकेच्या या प्रवृतिमुळे असे निदर्शनास येत आहे की नगर पालिका जाणूण बुजुन काही स्वार्थहिताने या विषयाला पाठीशी घालत आहे, रोहा नगरपालिकेच्या अंदाधुदी कारभाराच्या विरोधात २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी झेडावंदन करुन रोहा नगर पालिकेच्या मुख्यदवार समोर मी व माझे कुटुंब व माझे हितचिंतक सोबत आमरण उपोषणास बसणार आहे असे रोहा येथील मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील महिला सौ.सनोबर सफदर गजगे यांनी पत्रकारांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे,

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.