Press "Enter" to skip to content

सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना कर्जतनगरपरिषदेच्यावतीने अभिवादन

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती त्यांना कर्जत नगरपरिषदेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जानेवारी रोजी जयंती, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी उपनगराध्य अशोक ओसवाल, नगरसेविका संचिता पाटील, स्वामिनी मांजरे, नगरसेवक बळवंत घुमरे, राहुल डाळींबकर,नागरिक दिपक बेहेरे, अरुण निघोजकर, शिल्पा दगडे, सरस्वती चौधरी,मीना कुलकर्णी, नगरपरिषद कर्मचारी डि.के.गायकवाड, अविनाश पवार, सुरेश खैरे, सुनिल लाड, कल्याणी लोखंडे, लक्ष्मण माने,सुनिल लाड,सुदाम म्हसे आदी उपस्थित होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर बापू बेहराम आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यावर रविंद्र लाड यांनी माहिती सांगितली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.